इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर रॉकेट हल्ले

बगदाद – इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासात रविवारी रात्री रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये अमेरिकी दूतावासाच्या आवारातील मालमत्तेचे आणि मोटारींचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी हे हल्ले चढविल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला.

याआधी इराकमधील इराणसंलग्न दहशतवाद्यांनी तसेच ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या दूतावासाच्या दिशेने रॉकेट हल्ले चढविले आहेत. पण हे रॉकेट्स अमेरिकी दूतावासाच्या सुरक्षा भिंतीपर्यंत पोहोचले नव्हते. दूतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘सी-रॅम’ हवाई सुरक्षा यंत्रणेने आधीचे रॉकेट हल्ले यशस्वीरित्या भेदल्याची उदाहरणे आहेत. पण अमेरिका रविवारी दूतावासाच्या भिंतीपर्यंत तीन रॉकेट्स धडकल्याचा दावा इराकी सुरक्षा अधिकार्‍यांनी केला.

ही एक गंभीर घटना असून अमेरिकेने काही दिवसांपूर्वी दूतावासातील आपल्या काही कर्मचार्‍यांना मायदेशी रवाना केले होते.

leave a reply