रशिया इंधनाचा शस्त्रासारखा वापर करीत आहे

-फ्रान्सचा गंभीर आरोप

Agnes Pannier-Runacherपॅरिस/मॉस्को – युरोपला करण्यात येणाऱ्या इंधनपुरवठ्याचा वापर रशिया युद्धातील शस्त्राप्रमाणे करीत आहे, असा आरोप फ्रान्सने केला आहे. मंगळवारी रशियन कंपनी गाझप्रोमने युरोपिय देशांना करण्यात येणारा इंधनपुरवठा घटविल्यानंतर फ्रान्सकडून हा आरोप करण्यात आला. फ्रान्स ‘एनर्जी वॉर’चा आरोप करीत असतानाच हंगेरीने नजिकच्या काळात पश्चिम युरोपातील ऊर्जा यंत्रणा पूर्णपणे कोसळू शकते, असा इशारा दिला आहे. जागतिक विचारसरणी युरोपियन नागरिकांना हिवाळ्यात ऊब देऊ शकत नाही, असा टोला हंगेरीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला.

fuel as a weaponरशियाने गेल्या महिन्यापासून युरोपिय देशांना करण्यात येणारा इंधनवायूचा पुरवठा घटविला होता. युरोपला पुरवठा करणारी मुख्य इंधनवाहिनी असणाऱ्या ‘नॉर्ड स्ट्रीम 1’मधील इंधनपुरवठा तब्बल 60 टक्क्यांनी कमी केला. आता हा पुरवठा जेमतेम 20 टक्क्यांपर्यंत होत असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रशियन इंधनकंपनी गाझप्रोमने त्यातही घट केल्याचे समोर आले. यावर फ्रान्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

‘रशिया उघडपणे इंधनाचा वापर युद्धातील शस्त्रासारखा करीत आहे. युरोपिय देशांनी अधिक वाईट परिस्थितीसाठी तयार रहायला हवे. रशिया युरोपिय देशांचा इंधनपुरवठा पूर्णपणे बंद करु शकतो’, अRussia is using fuelसा इशारा फ्रान्सच्या ऊर्जामंत्री ॲग्नेस पॅनिअर-रुनाशेर यांनी दिला. बुधवार 31 ऑगस्ट ते शुक्रवार 2 सप्टेंबर या कालावधीत नॉर्ड स्ट्रीममधून होणारा पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत रशियाने याआधीच घोषणा केली आहे. त्यामुळे युरोपवरील इंधनटंचाईचे संकट अधिकच भीषण होण्याचे संकेत मिळत आहेत.

हंगेरीचे परराष्ट्रमंत्री पीटर सिझार्तो यांनी या मुद्याकडे लक्ष वेधले. योग्य पर्याय उपलब्ध नसतानाही रशियाचे इंधन नाकारण्याचे युरोपचे धोरण युरोपिय देशांमधील संपूर्ण व्यवस्थेला हादरे देणारे ठरु शकते, असा इशारा सिझार्तो यांनी दिला. पश्चिम युरोपिय देशांकडून करण्यात येणाऱ्या विविध वक्तव्यांकडे लक्ष वेधत अशी वक्तव्ये हिवाळ्यात कामास येणार नाहीत, याची जाणीव हंगेरीच्या मंत्र्यांनी करून दिली. दरम्यान, युरोपिय नेत्यांनी इंधनाच्या दरांवर मर्यादा आणण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर पुढील दशकभर युरोपियन जनतेला कडक व भीषण हिवाळ्यांना तोंड द्यावे लागेल, असे बेल्जियमचे ऊर्जा मंत्री टिन व्हॅन डर स्ट्रॅटन यांनी बजावले आहे.

leave a reply