अफगाणिस्तानच्या सीमेवरील धोका लक्षात घेऊन रशियाने ताजिकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरविली

ताजिकिस्तानला शस्त्रास्त्रेमॉस्को/काबुल – अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक स्थिती चिंताजनक आहे. यापासून उद्भवणार्‍या धोक्याचा सामना करण्यासाठी रशियाने ताजिकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरविली आहे, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली. काही दिवसांपूर्वी ताजिकिस्तानच्या सीमेजवळ तालिबानमधील आत्मघाती हल्लेखोर गटाच्या हालचाली वाढल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, रशियाने ताजिकिस्तानला ही शस्त्रास्त्रे पुरविल्याचे दिसत आहे. पण अफगाणिस्तानपासून शेजारी मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेला कुठलाही धोका नसल्याचा दावा तालिबान करीत आहे.

सोमवारी ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमाम अली रहमोन यांनी सेंट पीट्सबर्ग येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. ताजिकिस्तान हा रशियाचा विश्‍वासू आणि जवळचा मित्रदेश असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अफगाणिस्तान व ताजिकिस्तानच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावावर चिंता व्यक्त केली. या भेटीत अफगाणिस्तान तसेच क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा पार पडली. यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अफगाणिस्तानातील दहशतवादापासून असलेल्या धोक्याचा उल्लेख करून ताजिकिस्तानच्या सुरक्षेसाठी शस्त्रास्त्रे पुरविल्याची घोषणा केली.

ताजिकिस्तानला शस्त्रास्त्रेतालिबानने काबुलचा ताबा घेतल्यापासून अल कायदा आणि आयएसचे दहशतवादी अफगाणिस्तानात जम बसवू लागल्याचे आरोप होत आहेत. अल कायदा व आयएसच्या या दहशतवाद्यांपासून रशिया तसेच मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेला फार मोठा धोका संभवतो, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री ओलेग सिरोमोलोतोव्ह यांनी दिला आहे. अफगाणिस्तानातील या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर रशियाची बारीक नजर असल्याचे उपपराष्ट्रमंत्री ओलेग यांनी रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अफगाणिस्तानातील दहशतवादाप्रमाणे अंमली पदार्थांची तस्करी हा देखील तितकाच चिंतेचा विषय असल्याचे ओलेग म्हणाले.

डिसेंबरच्या सुरुवातीलाही रशियाने ताजिक-अफगाण सीमेवरील तणावाकडे लक्ष ताजिकिस्तानला शस्त्रास्त्रेवेधून माजी सोव्हिएत देशाला रणगाडे व इतर शस्त्रास्त्रे पुरविण्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर ताजिकिस्तानातील तळावर आपले अतिरिक्त जवान तैनात करण्याचे संकेत रशियाने दिले होते. कधीकाळी सोव्हिएत संघराज्याचा भाग असलेल्या मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेबाबत रशिया अतिशय संवेदनशील आहे. याआधीही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ताजिकिस्तानसह उझबेकिस्तान व तुर्कमेनिस्तान या अफगाणिस्तानच्या शेजारी देशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.

रशियन राष्ट्राध्यक्षांनी ताजिकिस्तानच्या सुरक्षेसाठी जाहीर केलेल्या नव्या तैनातीची तालिबानने दखल घेतली आहे. अफगाणिस्तानपासून शेजारी देशांच्या सुरक्षेला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे तालिबानचा प्रवक्ता इनामुल्ला समांगनी याने म्हटले आहे. याआधीही तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर देशांवर दहशतवादी कारवायांसाठी केला जाणार नसल्याचे जाहीर केले होते. पण तालिबान अल कायदा व आयएसच्या दहशतवाद्यांवर कारवाई करीत नसल्याची टीका आंतरराष्ट्रीय स्तरावरून होत आहे.

leave a reply