चेर्नोबिल अणुप्रकल्पावरील रशियन लष्कराचा ताबा भयावह

- व्हाईट हाऊसचा दावा

चेर्नोबिलवॉशिंग्टन – युक्रेनच्या चेर्नोबिल अणुप्रकल्पावर रशियन लष्कराने घेतलेला ताबा अतिशय चिंताजनक आणि भयावह असल्याची प्रतिक्रिया व्हाईट हाऊसने दिली. इतिहासातील सर्वात भीषण आणि गतीसाठी कारणीभूत ठरलेल्या या अणुप्रकल्पावरील रशियाचा ताबा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे वाईट हाऊसने म्हटले आहे. तर रशियन लष्कराने या प्रकल्पातील सुमारे ९२ कर्मचार्‍यांना ओलिस धरल्याचा आरोप युक्रेनपे केला आहे. १९८६ साली चेर्नोबिल अणुप्रकल्पातील चौथ्या क्रमांकाच्या अणुभट्टीमध्ये स्फोट होऊन किमान शंभर जणांचा बळी गेला तर हजारो जण या आण्विक गळतीने बाधित झाले होते. त्यानंतर हा प्रकल्प गेली काही वर्षे बंदच होता. अशा परिस्थितीत, शुक्रवारी युक्रेनमध्ये दाखल झालेल्या रशियन लष्कराने या अणुप्रकल्पाचा ताबा घेतल्यानंतर अमेरिका व युरोपीय देशांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आण्विक गळती झालेल्या प्रकल्पाचा ताबा घेऊन रशिया सगळ्यांची सुरक्षा धोक्यात टाकत असल्याचा आरोप व्हाईट हाऊस करीत आहे. दरम्यान, रशियन लष्कराने चेर्नोबिल अणुप्रकल्पाचा ताबा घेऊन युक्रेनमधील संघर्षात मोठी आघाडी घेतल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. बेलारुसमार्गे युक्रेनची राजधानी किव्हपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात छोटा मार्ग असल्याचा दावा केला जातो. चेर्नोबिल अणूप्रकल्पापासून राजधानी किव्ह १०८ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा ताबा घेऊन रशियन लष्कराने राजधानी किव्हच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचा, इशारा विश्लेषक देत आहेत.

leave a reply