युक्रेनचे युद्ध संपल्यानंतर रशियाचे हितसंबंध दुर्लक्षित करता येणार नाहीत

ukraine-war वॉशिंग्टन/मॉस्को – ‘रशिया-युक्रेन युद्धात रशियाचा पराभव करणे आणि जागतिक शक्ती म्हणून रशियाचे स्थान नाकारणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रशियाच्या हितसंबंधांना नाकारता येणार नाही’, असे ज्येष्ठ अमेरिकी मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी बजावले. किसिंजर यांनी रशिया-युक्रेन युद्धातील विविध शक्यतांचाही उल्लेख केला. गेल्या महिन्याभरात किसिंजर यांनी दोनदा रशिया-युक्रेन युद्धाबाबत वक्तव्ये केली असून रशियन हितसंबंध व स्थानाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे.

ukraine's-warज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचे नवे पुस्तक ‘लीडरशिप: सिक्स स्टडिज्‌‍ इन वर्ल्ड स्ट्रॅटेजी’ प्रकाशित झाले आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत आपली भूमिका मांडली. रशिया-युक्रेन युद्धात रशियाचा पराभव झाला तरी रशियाचा दृष्टिकोन विचारात घ्यायला हवा, असे किसिंजर म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सध्या युद्धाची अखेर होण्याबाबत तीन शक्यता दिसत असल्याचेही स्पष्ट केले.

‘पहिल्या शक्यतेत, रशियाने आजच्या घडीला युक्रेनच्या ज्या भागावर नियंत्रण मिळविले आहे, तो भाग रशिया आपल्या ताब्यात ठेवेल. असे झाले तर हा रशियाचा विजय ठरेल व नाटोची भूमिका निर्णायक नसल्याचे सिद्ध होईल’, असे किसिंजर म्हणाले. ‘दुसऱ्या शक्यतेत युक्रेनकडून रशियाने क्रिमिआसह आतापर्यंत जिंकलेला भाग ताब्यात घेण्यासाठी कारवाई करु शकतो. यात रशियाविरोधातील युद्ध लांबू शकते’, असे अमेरिकी मुत्सद्यांनी सांगितले.

Service members of pro-Russian troops ride an infantry fighting vehicle in Popasna‘तिसरी शक्यता, रशियाने फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वीची स्थिती निर्माण होण्याची आहे. यात युक्रेन पुन्हा एकदा आपल्या नियंत्रणाखालील भागाची उभारणी करेल व नाटो युक्रेनला शस्त्रसज्ज करेल’, असा दावा किसिंजर यांनी केला. यापूर्वी मे महिन्यात डॅव्होसमधील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बैठकीत बोलताना किसिंजर यांनी, सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात शांतीकरारासाठी प्रयत्न करायचे असतील तर युक्रेनने आपला थोडा भूभाग रशियाला द्यायला हवा, असा सल्ला दिला होता.

तर, गेल्या महिन्यात ब्रिटनमधील ‘टाईम्स’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रशियाला युरोपातील चीनचे प्रभावकेंद्र बनवायचे नसेल, तर पाश्चिमात्य देशांनी रशियाचे हितसंबंध लक्षात घ्यायला हवेत, असे बजावले होते.

leave a reply