आयएसच्या धमकीनंतर सौदी, युएईने अफगाणिस्तानातील दूतावास बंद केले

saudi embassy afghanistanकाबुल – आयएसच्या दहशतवाद्यांनी दिलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबिया व युएईने अफगाणिस्तानातील आपले दूतावास बंद केले आहे. सौदीने आपले राजदूत, राजनैतिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाकिस्तानात हलविल्याच्या बातम्याही येत आहेत. पाकिस्तान व तुर्कीने याआधीच आपले दूतावास बंद केल्याचाही दावा केला जातो.

अफगाणिस्तानातील सुरक्षास्थिती अतिशय धोकादायक बनल्याचा आरोप अमेरिका व युरोपिय देश करीत आहेत. आयएसचे दहशतवादी हल्ले रोखण्यात तालिबान अपयशी ठरल्याचा दावा अमेरिका करीत आहे. राजधानी काबुलमधील चीनच्या हॉटेलवर झालेल्या आयएसच्या हल्ल्यानंतर हा मुद्दा ठळकपणे उपस्थित करण्यात आला होता. त्यातच गेल्या आठवड्यात आयएसने सौदीच्या दूतावासावर कार बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली आहे. यानंतर सौदीने काबुलमधील आपले दूतावास बंद केले. त्याच्याआधी युएईनेही काबुलमधील आपल्या दूतावासाला टाळे ठोकले होते.

तर भारत, रशिया, चीन, कतार, इराण आणि मध्य आशियाई देशांचे दूतावास अजूनही काबुलमध्ये सुरू आहेत.

leave a reply