उत्तर कोरियाविरोधी युद्धासाठी दक्षिण कोरिया तयार नाही

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल

yoon suk yeolसेऊल – उत्तर कोरियाच्या पाच ड्रोन्सनी कुठल्याही विरोधाशिवाय थेट दक्षिण कोरियाच्या हवाईहद्दीत प्रवेश केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी याची जबाबदारी स्वीकारून आपला देश उत्तर कोरियाविरोधी युद्धासाठी तयार नसल्याचे कबुल केले. त्याचबरोबर उत्तर कोरियाविरोधी युद्धासाठी दक्षिण कोरियाला आपल्या सामर्थ्यात मोठी व तातडीने वाढ करावी लागेल, अशी सूचना राष्ट्राध्यक्ष येओल यांनी केली.

2022 सालात उत्तर कोरियाने 90 हून अधिक बॅलेस्टिक तसेच मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊन या क्षेत्रात तणाव निर्माण केला होता. उत्तर कोरियाच्या या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या सहाय्याने युद्धसरावांची तीव्रता वाढविली होती. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी अधिक आक्रमक भूमिका स्वीकारल्याचा दावा केला जात होता. पण सोमवारी उत्तर कोरियाच्या एका लष्करी कारवाईने दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष येओल यांना अडचणीत टाकले.

korea drone war-tit-for-tatसोमवारी उत्तर कोरियाच्या पाच ड्रोन्सनी वेगवेगळ्या भागातून दक्षिण कोरियाच्या हवाईहद्दीत प्रवेश करून टेहळणी केली. या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण कोरियाने लढाऊ विमाने रवाना करून उत्तर कोरियन ड्रोन्सना पिटाळले. एका ड्रोनवर निशाणा लावताना लढाऊ विमान कोसळले. साधारण सात तास हा संघर्ष सुरू होता. त्यामुळे दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांवरील टीकेची तीव्रता वाढली. पुढच्या काही तासात दक्षिण कोरियाने देखील उत्तर कोरियाच्या हद्दीत ड्रोन्स रवाना केले. त्याचबरोबर उत्तर कोरियन ड्रोन्सच्या घुसखोरीविरोधात 44 कोटी डॉलर्सची योजनाही मांडली.

पण राजकीय विरोधक तसेच लष्करी विश्लेषकांच्या टीकेनंतर राष्ट्राध्यक्ष येओल यांनी उत्तर कोरियाविरोधी युद्धासाठी आपल्या देशाकडे लष्करी सज्जता नसल्याचे मान्य केले. त्याचबरोबर येत्या काळात उत्तर कोरियाविरोधातील टेहळणी व हेरगिरी वाढविण्याचे राष्ट्राध्यक्ष येओल यांनी जाहीर केले.

हिंदी English

leave a reply