युक्रेन सीमेबरील तणावामुळे रशिया-युरोप इंधनपुरवठा विस्कळीत होईल

- अमेरिकी वित्तसंस्थेचा इशारा

वॉशिंग्टन – युक्रेनमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नॉर्ड स्ट्रीम२’ इंधनवाहिनीवर निर्बंध लादले तर रशिया व युरोपमधील इंधनपुरवठा अनिश्‍चित काळासाठी विस्कळीत होऊ शकतो, असा इशारा ‘गोल्डमन सॅक्स’ या अमेरिकी वित्तसंस्थेने दिला. गेल्या काही महिन्यांपासून रशियाकडून युरोपला होणारा इंधनपुरवठा कमी झाल्याचे दावे सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी वित्तसंस्थेचा नवा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

युक्रेन सीमेबरील तणावामुळे रशिया-युरोप इंधनपुरवठा विस्कळीत होईल - अमेरिकी वित्तसंस्थेचा इशारागोल्डमन सॅक्सने युक्रेनमधील तणावाचा वेध घेणारी एक नोट प्रसिद्ध केली आहे. त्यात युक्रेनमधील तणाव वाढल्यास त्याचे परिणाम रशियाच्या युरोपमधील इंधनपुरवठ्यावर होतील व युरोपमध्ये इंधनाच्या दरांचा भडका उडेल, असे बजावले आहे. रशियाने इंधनपुरवठा पूर्वीप्रमाणे नियमित केला तरी २०२५ सालापर्यंत युरोपमधील इंधनाची समस्या कायम राहिल, असेही अमेरिकी वित्तसंस्थेने म्हटले आहे.

leave a reply