दिल्ली पोलिसांकडून दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त

- तीन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या सहाय्याने सक्रिय असलेल्या खलिस्तानवादी दहशतवाद्यांचे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली असून शस्त्रात्रे देखील जप्त करण्यात आली.

Delhi-Police-Terroristsअटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. मोहिंदर पाल सिंग (दिल्ली), गुरतेज सिंग (पंजाब) आणि लव्हप्रीत सिंग (हरियाणा) अशी या तिघांची नावे आहेत. आयएसआयकडून येणाऱ्या सूचनांनुसार या तिघांनी हल्ल्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तिघांकडून तीन पिस्तूल, जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

मोहिंदरच्या कारवायांविषयी पोलिसांना माहिती मिळाली होती, असे पोलीस उपायुक्त (विशेष सेल) संजीव कुमार यादव म्हणाले. या माहितीनंतर १५ जून रोजी हस्तसाल येथील गंडा नालाजवळ सापळा रचून त्याला अटक करण्यात आली होती.

मोहिंदरच्या चौकशीत लव्हप्रीतला हरियाणाच्या कैथल येथून अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस दोघांना घेऊन पंजाबमधील मानसा येथे नेले, जेथे गुरतेज याला अटक करण्यात आली. अटक केलेले तीनही दहशतवादी ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’च्या अन्य नेत्यांच्या संपर्कात होते.गुरतेजसिंग पाकिस्तानी आयएसआय हस्तक अब्दुल्ला, शीख फॉर जस्टीसचा अवतारसिंग पन्नू आणि२६/११ च्या हल्ल्यातील आरोपी हाफिज सईदचा जवळचा सहकारी गोपाळसिंग चावला यांच्याशी संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे.

leave a reply