जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटना नेतृत्वहीन

श्रीनगर – सीमेवरील चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीत झालेली घट आणि दहशतवाद्यांविरोधातील जोरादार कारवाईमुळे जम्मू-काश्मीरमध्ये फक्त २०० दहशतवादी शिल्लक राहिले आहेत. मुख्य म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत सर्व दहशतवादी संघटनांना नेतृत्वच उरलेले नसल्याची माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटना नेतृत्वहीन२०१९ पासून दहशतवाद्यांबरोबर त्यांना सहाय्य करणाऱ्यांवर देखील जोरदार कारवाई सुरु आहे. यामुळे दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळणे कठीण बनले आहे. याचबरोबर कित्येक फुटीर हुरियत नेते अटकेत आहेत. शेकडो ओव्हरग्राऊंड वर्कर्स, दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर चांगल्या वर्तणुकीची हमी घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर हिंसाचार आणि दहशतवाद्यांना मिळणारे सहाय्य थांबले आहे, असे दिलबाग सिंग यांनी सांगितले.

यासह जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान सीमेवरून ड्रोनच्या सहाय्याने शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात येत असून पंजाबमधून देखील शस्त्रास्त्र जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्यात येत आहेत. मात्र सुरक्षादलाकडून तस्करीचे प्रयत्न हाणून पाडण्यात येत आहेत. यासह दहशतवादी ठिकाणे उद्धवस्त करत शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शस्त्रास्त्राचा तुटवडा आणि तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण कमी झाल्याने दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली आहे, असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग म्हणाले.

‘कॉर्डन आणि सर्च ऑपरेशन्स’ (सीएएसओ) राबवून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यावर्षी ५ हजार ‘सीएएसओ’ राबवण्यात आले आहेत. यामध्ये काही दहशतवादी ठार झाले, तर काही दशतवाद्यांना अटक करण्यात आली. . या वर्षी ३१ जुलै पर्यंत १५० दहशतवाद्यांना ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांमध्ये १२० स्थानिक दहशतवादी असून ३० पाकिस्तानी दहशतवादी होते, अशी माहितीही पोलीस महासंचालकांनी दिली.

स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण कमी असले तरी या वर्षी ८० तरुण दहशतवादी संघटनांमध्ये भरती झाले होते. त्यातील ३८ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून २२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. २० दहशतवादी अद्याप सक्रिय असल्याचे, दिलबाग सिंग यांनी सांगितले.

leave a reply