इस्तंबूल स्फोटातील दहशतवाद्यांना अमेरिकेचे समर्थन मिळाले होते

तुर्कीच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांचा आरोप

iran iraq kurd strikeइस्तंबूल – इस्तंबूल शहरात घडविलेल्या स्फोटाचा कट सिरियाच्या कोबानी शहरात शिजला होता. यासाठी ‘पीकेके’ आणि संलग्न ‘वायपीजी’ या दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा ठपका तुर्कीचे अंतर्गत सुरक्षामंत्री सुलेमान सोयलू यांनी ठेवला. कोबानीतील या दहशतवादी गटांना अमेरिकन सिनेटने पैसा पुरविला असून तेच आता तुर्कीतील शांती नष्ट करीत आहेत, असा गंभीर आरोप सोयलू यांनी केला. म्हणूनच अशा दहशतवादी गटांचे समर्थन करणाऱ्या अमेरिकेचे सांत्वन स्वीकारू शकत नसल्याचे सोयलू यांनी म्हटले आहे.

रविवारी इस्तंबूल शहराला हादरवून टाकणाऱ्या स्फोटात सहा जणांचा बळी गेला तर ८० हून अधिक जण जखमी झाले. तुर्कीच्या यंत्रणांनी या स्फोटातील मुख्य महिला आरोपीची माहिती उघड केली असून यामागे ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’ व सिरियातील संलग्न दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे जाहीर केले होते. पण पीकेके तसेच इतर कुर्द गटांनी तुर्कीचे हे आरोप फेटाळले आहेत. पीकेके आणि सिरियातील ‘वायपीजी’ तसेच ‘एसडीएफ’ या कुर्द गटांना तुर्कीने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.

तर अमेरिका तसेच रशिया व सिरियाने आयएसविरोधी संघर्षात याच कुर्द गटांचे सहाय्य घेतले होते. असे असले तरी तुर्की कायम कुर्द गटांना दहशतवादी संघटना म्हणून संबोधित करत आहे.

leave a reply