तालिबानकडून तुर्कीला सैन्यमाघारीचा इशारा

काबुल – ‘अफगाणिस्तानचे तुर्कीबरोबर ऐतिहासिक संबंध राहिले आहेत. तुर्कीशी मैत्रीपूर्ण सहकार्य असून यापुढेही ते असेच कायम रहावे, अशी इच्छ आहे. पण नाटोचा सदस्यदेश म्हणून गेली 20 वर्षे अफगाणिस्तानात सैन्य तैनात ठेवणार्‍या तुर्कीने आपल्या इतर सहकारी देशांबरोबरच मित्रदेशांबरोबरच अफगाणिस्तानातून माघार घ्यावी’, अशा स्पष्ट शब्दात तालिबानने तुर्कीला चालते होण्याचा इशारा दिला.

तालिबानकडून तुर्कीला सैन्यमाघारीचा इशाराअफगाणिस्तानमध्ये तुर्कीचे 500 जवान तैनात आहेत. नाटोच्या माघारीनंतरही राजधानी काबुलमध्ये सैन्य तैनात करण्याचा प्रस्ताव तुर्कीने नाटोला दिला होता. काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी ही तैनाती करण्याचे तुर्कीने सुचविले होते. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्याआधीच तालिबानने तुर्कीचा हा प्रस्ताव धुडकावला.

गेल्या वर्षी अमेरिका व नाटोबरोबर झालेल्या करारानुसार, परदेशी लष्कराने अफगाणिस्तानातून माघार घ्यायचे ठरले होते. तुर्की देखील नाटोचा सदस्य देश असल्यामुळे त्यांनी देखील आपल्या मित्रदेशांबरोबर अफगाणिस्तानातून निघून जावे, असे तालिबानच्या प्रवक्त्याने बजावले आहे. महिन्याभरापूर्वी तुर्कीमध्ये आयोजित केलेल्या बैठकीतही तालिबानने सहभागी होण्याचे टाळले होते.

leave a reply