इराकमधील कुर्दांवर तुर्कीचे हवाई हल्ले

- १९ कुर्द बंडखोर ठार केल्याचा तुर्कीचा दावा

अंकारा/बगदाद – सार्‍या जगाचे लक्ष युक्रेनमधील युद्धावर लागलेले असताना तुर्कीने इराकमध्ये सैन्य घुसवले. इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यात १९ कुर्द बंडखोरांना ठार केल्याची माहिती तुर्कीचे संरक्षण मंत्री हुलूसी अकार यांनी दिली. ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’ या कुर्द बंडखोरांच्या संघटनेला लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले चढवल्याचे तुर्कीने म्हटले आहे. दरम्यान काही भागांमध्ये कुर्द बंडखोरांनी तुर्कीच्या घुसखोर स्पेशल फॉर्सेसना पिटाळून लावल्याच्या बातम्या येत आहेत.

१९ कुर्दतुर्कीचे संरक्षणमंत्री अकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीने इराकमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी मोहीम छेडली आहे. ‘ऑपरेशन क्लॉ लॉक’ या लष्करी मोहिमेअंतर्गत तुर्कीचे स्पेशल फोर्सेस व लष्कराने इराकमध्ये घुसखोरी केली आहे. तुर्कीची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, आणि ड्रोन्स इराकच्या उत्तरेकडील भागावर भीषण हवाई हल्ले चढवित आहेत. तुर्कीच्या लढाऊ विमानांनी इराकमध्ये चढविलेल्या हल्ल्यांमध्ये कुर्द बंडखोरांचे छुपे तळ, बंकर्स, भुयारी मार्ग, शस्त्रास्त्रांचे कोठार आणि काही महत्त्वाची ठिकाणे उद्धवस्त केली. संरक्षण मंत्री अकार यांनी लष्कराच्या संकेतस्थळावर या संबंधित व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

१९ कुर्दइराकच्या उत्तरेकडील भागात ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके’च्या बंडखोरांचे मुख्यालय आहे. पृथ्वीवर हल्ले चढवण्यासाठी पीकेकेचे बंडखोर इराकमधील आपल्या ठिकाणांचा वापर करीत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री अकार यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून पीकेकेचे बंडखोर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. पीकेकेच्या बंडखोरांनी तुर्कीवर मोठ्या हल्ल्याची योजना आखली होती, असा ठपका ठेवून संरक्षणमंत्री अकार यांनी इराकवरील कारवाईचे समर्थन केले. तसेच कारवाईचा पहिला टप्पा आता कुठे पूर्ण होत असून यापुढेही पीकेकेवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे तुर्कीने जाहीर केले.

तुर्कीच्या मित्र आणि सहकारी देशांच्या सहाय्याने ही कारवाई सुरू असल्याचे संरक्षणमंत्री अकार यांनी स्पष्ट केले. पण या देशांची माहिती देण्याचे अकार यांनी टाळले. ना कारवाईच्या एक आठवडा आधी इराकमधील कुर्दिस्तान प्रांताचे पंतप्रधान मसरूर बर्झानी यांनी तुर्कीचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी तुर्कीने इराकमध्ये सैन्य घुसवून कुर्द बंडखोरांवर कारवाई केली. पण अजूनही कुर्दिस्तान प्रांताच्या प्रमुखांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत. तर युक्रेनमधील युद्धाचा फायदा घेऊन तुर्कीने इराकमध्ये सैन्य घुसवल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

leave a reply