पुण्यात ‘आयएस खोरासन’शी संबंधित दोघांना अटक

Pune-IS-Khorasan-NIAपुणे –  ‘आयएस खोरासन’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन जणांना ‘एनआयए’ने पुण्यातून अटक केली आहे. यामध्ये एक महिला असून मागील काही दिवसांपासून तपास यंत्रणांकडून या दोघांवर लक्ष्य ठेवण्यात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाबील सिद्दीकी खत्री (२७) आणि सादिया अनवर शेख (२१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नाबील याला कोंढवा येथून आणि सदियाला येरवडा येथून अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुणे पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेतले.

Pune-IS-Khorasanमार्च महिन्यात ‘आयएस खोरासन’शी संबंधित काश्मिरी जोडप्याला नवी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. जहान झैब सामी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग अशी या दोघांची नावे आहेत. भारतात दंगली घडवून आणण्याची त्यांची योजना होती. त्यांच्या चौकशीतही नाबील आणि सादियाचे नाव समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सादियावर २०१५ पासूनच लक्ष ठेवण्यात येत होते. सीरियाला जाऊन “आयएस’ मध्ये सहभागी होण्याचा तिचा विचार होता. मात्र त्याआधीच तीला ताब्यात घेण्यात आले होते. डिसेंबर २०१५ मध्ये तीचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी तिच्या विरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयारून तिला २६ जानेवारी २०१८ रोजी जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यावेळेही पुराव्याअभावी तिची सुट्का झाली होती.

leave a reply