जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान शहीद

श्रीनगर, – जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्यानंतर श्रीनगरमधील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.                                 

 बुधवारी संध्याकाळच्या सुमारास श्रीनगरमधील गंदेरबाल जिल्ह्यात  ‘सीमा सुरक्षा दला’च्या (बीएसएफ) ३७ बटालियनचे जवान गस्त घालत होते. अचानक आलेल्या दहशतवाद्यांनी या जवानांवर गोळीबार केला. बीएसएफच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. मात्र इथून दहशतवाद्यांना निसटण्यात यश आले. या चकमकीत बीएसएफचे दोन जवान शहीद झाले. आता तो परिसर संपूर्ण सील केला असून दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तर जिल्ह्यात हाय-अर्लट जारी करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यात हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

leave a reply