जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ‘लश्कर’चे दोन दहशतवादी ठार

'लश्कर'श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलांनी चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. तसेच एक दहशतवादी यावेळी शरण आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या एका महिन्यात सुमारे सहा दहशतवादी शरण आले आहेत.

पुलवामा जिल्ह्यातील पंपोरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. यानंतर पोलीस, ५० राष्ट्रीय रायफल (आरआर) आणि ‘सीआरपीएफ’ यांनी संयुक्तरित्या गुरुवारी सायंकाळी मोहीम हाती घेतली. यादरम्यान सुरक्षादलाचे जवान आणी दहशतवाद्यामंध्ये चकमक उडाली. सुरक्षादलांनी या भागाला वेढा देत दहशतवादी निसटून जाणार नाहीत, याची दक्षता घेतली. शुक्रवारी रात्री काळोखामुळे मोहीम थांबवण्यात आली. चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षादलांच्या जवानांना यश आले.

'लश्कर'

या चकमकीत दोन नागरिक जखमी झाले होते. जखमी नागरिकांपैकी एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एका नागरिकावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे आधिकाऱ्यांनी सांगितले. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी एक दहशतवादी शरण आला. शरण आलेल्या दहशतवाद्याचे नाव खवार सुलतान मीर असून तो द्रांगबल पाम्पोराचा रहिवाशी आहे. हा दहशतवादी चकमकीत जखमी झाला होता.

जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर सुरक्षादलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. मागील ११ महिन्यात सुरक्षादलांनी केलेल्या कारवाईत तब्बल २०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी नुकतीच दिली होती.

leave a reply