2019 सालच्या जून महिन्यात अमेरिकेच्या युद्धनौकेवर शंभर युएफओ घिरट्या घालत होते

- अमेरिकन माहितीपटकाराचा दावा

युएफओवॉशिंग्टन – 2019 सालच्या जुलै महिन्यात अमेरिकन नौदलाची युद्धनौका दक्षिण कॅलिफोर्नियाच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास करीत होती. अचानकपणे या युद्धनौकेवरून शंभराहून अधिक ‘फ्लाईंग ऑब्जेक्ट’ अर्थात उडत्या तबकड्यासदृश्य गोष्टी वावरू लागल्या. विविध रंगांचे प्रकाशझोत टाकणाऱ्या आणि अद्भूत क्षमता असलेले हे फ्लाईंग ऑब्जेक्ट म्हणजे दुसरे तिसरे काी नसून परग्रहवासियांच्ये युएफओज्‌‍ असल्याचा दावा केला जात आहे. या युद्धनौकेवरील काहीजण ठासून हे सांगत आहेत. माहितीपट तयार करणारे जेरमी कॉर्बेल यांनीही तसा दावा केला आहे. पण अमेरिकन नौदलाचे वरिष्ठ अधिकारी मात्र हे ड्रोन्स होते, असे सांगून हा मुद्दा निकालात काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

युएफओहे फ्लाईंग ऑब्जेक्टस्‌‍ म्हणजे ड्रोन्स हेोते, हे नौदल अधिकाऱ्यांचे म्हणणे असून आपल्याल मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढता येईल, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पण माहितीपट तयार करणाऱ्या, तसेच सदर युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या जेरमी कॉर्बेल यांनी हा निष्कर्ष धुडकावून लावला आहे. हे घडले त्यावेळी अमेरिक नौदलाचे वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या निष्कर्षापेक्षाही या युद्धनौकेवर असलेल्यांचे पहिलेल्या गोष्टींची दखल घ्यायला हवी, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे कॉर्बेल यांनी बजावले आहे.

कदाचित हे युएफओ नसतील किंवा ते ड्रोन्स देखील असू शकतील. अथवा हे सीगल पक्षी देखील असू शकतात. पण मी एका वेगळ्याच गोष्टीकड लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीतआहे. ही काही तासांसाठी त्या युद्धनौकेवरील सर्वांना विस्मयचकीत करणारी घटना कोण नियंत्रित करीत असावा? हा माझा प्रश्न आहे, असे सांगून कॉर्बेल यांनी ही सर्वसाधारण बाब नसल्याचे ठासून सांगितले. इतकेच नाही तर या घटनेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे 9/11 हल्ल्याच्या आधी झालेल्या गोष्टींकड दुर्लक्ष करण्यासारखे ठरेल, असा इशारा कॉर्बेल यांनी दिला आहे.

युएफओअमेरिकन युद्धनौकेवर भिरभिरणारे व अद्भूत क्षमता असलेेले फ्लाईंग ऑब्जेक्टस्‌‍ अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यांचे केवळ अस्तित्त्व देखील आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक ठरू शकते, असे कॉर्बेल यांनी बजावले आहे. पण सध्या तरी त्यांचे अमेरिकेचे नौदल अधिकारी उघडपणे विचारात घ्यायला तयार नाहीत. याआधीही युएफओ पाहिल्याचे दावे अमेरिकेच्या विविध यंत्रणांनी निकालात काढले होते. मात्र अलिकडच्या काळात याची उघडपणे कबुली देण्याची गरज अमेरिकेला वाटू लागली आहे. कारण परग्रहवासियांबाबतची सारी माहिती अमेरिकेत दडवून ठेवली जात असून यासंदर्भात जनतेला सत्य कळायला हवे, अशी मागणी जोर पकडत आहे.

काही दिवसांपूर्वी जपानमधील एका संशोधकाने वर्षभराच्या कालावधीत युएफओ अर्थात परग्रहवासियांचे यान पाहिल्याच्या 452 नोंदी समोर आल्याचा दावा केला होता. याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज्‌‍ आपण जगजाहीर करू शकतो, असे या जपानच्या संशोधकाने म्हटले आहे.

leave a reply