युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला चर्चेचा प्रस्ताव

किव्ह/मॉस्को – रशियाची व्यापक लष्करी तैनाती व आक्रमणाची वाढती शक्यता या पार्श्‍वभूमीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. ‘रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना नक्की काय हवे आहे, हे मला माहित नाही. त्यामुळे मीच त्यांच्यासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवत आहे. चर्चेचे ठिकाण रशियाने निवडावे. शांततापूर्ण तोडग्यासाठी युक्रेन राजनैतिक प्रयत्न सुरू ठेवेल’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचवेळी पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक बंडखोरांकडून देण्यात येणार्‍या हिंसक चिथावणीला युक्रेन प्रतिसाद देणार नाही, असा दावाही झेलेन्स्की यांनी केला आहे.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला चर्चेचा प्रस्तावपाश्‍चात्य देशांच्या दाव्यानुसार रशियाने युक्रेन सीमेवर जवळपास १ लाख, ९० हजार जवान तैनात केले आहेत. रशियाच्या तैनातीपाठोपाठ पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांतांमधील बंडखोर गटांकडून हल्ल्यांना सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भागातील बंडखोरांनी लष्करी जमवाजमव सुरू केली असून आणीबाणीची घोषणाही केली आहे. गेल्या काही दिवसात या भागात सातत्याने स्फोट व हल्ल्यांचे सत्र सुरू युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला चर्चेचा प्रस्तावझाले असून युक्रेनचे दोन जवान ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पूर्व युक्रेनमधील सात लाख नागरिकांना रशियात जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा सर्व घटनाक्रमक रशियाकडून युक्रेनवर करण्यात येणार्‍या आक्रमणाचा भाग असल्याचा दावा नाटोकडून करण्यात आला आहे.

leave a reply