अमेरिकेने पर्शियन आखातातील इराणच्या कारवाया नियंत्रित केल्या आहेत

पर्शियन आखातातीलमनामा – पर्शियन आखातातील परदेशी इंधनवाहू जहाजांवर हल्ले चढवून तसेच जहाजांचे अपहरण करून इराणने या क्षेत्रात अस्थैर्य माजविले होते. पण अमेरिकेने इराणच्या या कारवाया नियंत्रित केल्याचा दावा अमेरिकेच्या पाचव्या आरमाराचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल सॅम पॅपॅरो यांनी केली. तसेच इराणच्या या हालचालींकडे अमेरिका अधिक सावधपणे आणि काळजीपूर्वक पाहत असल्याचे व्हाईस ॲडमिरल पॅपॅरो यांनी स्पष्ट केले.

बाहरिनची राजधानी मनामा येथे ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज्‌’ या अमेरिकी अभ्यासगटाने वार्षिक ‘मनामा डायलॉग’चे आयोजन केले होते. बाहरिनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या आरमाराचे प्रमुख वाईस ॲडमिरल पॅपॅरो यांनी या बैठकीच्या निमित्ताने पर्शियन आखातातील इराणच्या कारवायांना लक्ष्य केले.

पर्शियन आखातातीलगेल्या वर्षी पर्शियन तसेच रेड सीच्या क्षेत्रात सौदी अरेबियासह संयुक्त अरब अमिराती व काही परदेशी इंधनवाहू जहाजांवर हल्ले झाले होते. या हल्ल्यांची जबाबदारी येमेनमधील हौथी बंडखोरांनी स्वीकारली होती. पण हौथींकडे एवढे प्रगत तंत्रज्ञान नसल्याचे सांगून इराणनेच हे हल्ले चढविल्याचा आरोप अमेरिका व सौदीने केला होता.

इराणच्या या हल्ल्यांमुळे सदर सागरी क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता. पण अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कारवाया व त्यायोगे घडलेल्या घटनाक्रमांमुळे या क्षेत्रातील अस्थैर्याचे निवारण झाल्याचा दावा वाईस ॲडमिरल पॅपॅरो यांनी केला. या कारवाया कोणत्या यावर अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांनी खुलासा केला नाही. पण गेल्या काही महिन्यांमध्ये इराणच्या सागरी हालचाली कमी झाल्याचा दावा पॅपॅरो यांनी केला. तसेच इराणचे नौदल सदर सागरी क्षेत्रात कुठल्याही प्रकारची आगळीक करणार नाही आणि तणाव वाढविणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे व्हाईस ॲडमिरल पॅपॅरो म्हणाले.

याआधी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख व निवृत्त नौदल अधिकारी व्हाईस ॲडमिरल जेम्स मॅलोय यांनी इराणच्या पर्शियन आखातातील हालचाली अतिशय बेपर्वा आणि प्रक्षोभक असल्याची टीका केली होती. तसेच इराणचे रिव्होल्युशनरी गार्डस पर्शियन आखाताचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता. तर यावर्षी ऑगस्ट महिन्यात रिव्होल्युशनरी गार्ड्‌सने युएईचे इंधनवाहू जहाज ताब्यात घेतल्याची घोषणा केली होती. तर गेल्या महिन्यात ‘रेड सी’ क्षेत्रातील इंधनवाहू जहाजावर सागरी सुरुंगाने हल्ला चढविल्याची घटनाही समोर आली होती.

या पार्श्‍वभूमीवर, इराणच्या कारवाया अमेरिकेने रोखल्याची व त्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही केल्याचा व्हाईस ॲडमिरल पॅपॅरो यांनी केलेला दावा विश्‍लेषकांचे लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply