रशियावरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका नाटोच्या सरावासाठी भूमध्य सागरात दाखल

वॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेन मुद्यावरून रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव चिघळत असतानाच अमेरिकेने आपली विमानवाहू युद्धनौका भूमध्य सागरी क्षेत्रात धाडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात नाटो देशाच्या ‘नेपच्युन स्ट्राईक २२’ या नौदल सरावाला सुरुवात होत आहे. या सरावात अमेरिकेची ‘युएसएस हॅरी एस. ट्रुमन’ ही आण्विक विमानवाहू युद्धनौका ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’सह सहभागी होणार आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने याची माहिती दिली आहे. अमेरिकेपाठोपाठ रशियानेही व्यापक नौदल सरावांची घोषणा केली असून पॅसिफिक क्षेत्रापासून ते अटलांटिक महासागरापर्यंत सर्व भागात रशियन आरमार सराव करणार असल्याचे जाहीर केले आहे.

रशियावरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका नाटोच्या सरावासाठी भूमध्य सागरात दाखलयुक्रेनच्या सीमेनजिक सुरू असणारी रशियाची व्यापक लष्करी तैनाती पाश्‍चात्य देशांच्या चिंता वाढविणारी ठरली आहे. रशिया युक्रेनवर आक्रमण करण्याची शक्यता असल्याचे इशारे आघाडीच्या देशांकडून देण्यात येत आहेत. रशियाच्या या संभाव्य आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यसाठी अमेरिकेसह सर्वच देशांनी हालचाली सुरू केल्या आहेत. रशिया-युक्रेन तणाव विकोपाला पोहोचला असतानाच नाटोने भूमध्य सागरी क्षेत्रात व्यापक नौदल सरावाचे आयोजन केले आहे.

‘नेपच्युन स्ट्राईक २२’ नावाचा हा सराव सोमवार २४ जानेवारीपासून सुरू होणार असून १२ दिवस चालणार आहे. या सरावात नाटोतील आघाडीचे सदस्य देश सहभागी होणार आहेत. युरोपातील वाढता तणाव पाहता अमेरिकेने यासाठी आपली विमानवाहू युद्धनौका व कॅरिअर स्ट्राईक ग्रुप पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापक सरावासाठी २०२० सालापासून आखणी सुरू होती, असा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.

नाटो सदस्य देशांना विमानवाहू युद्धनौका व कॅरिअर स्ट्राईक ग्रुपच्या क्षमतांची ओळख तसेच मोहिमांचा सराव व्हावा, यासाठी ‘युएसएस हॅरी एस. ट्रुमन’ ही आण्विक विमानवाहू युद्धनौका ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’सह सहभागी होणार असल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. रशियावरील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका नाटोच्या सरावासाठी भूमध्य सागरात दाखलनाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी अमेरिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अमेरिकेच्या या निर्णयावर रशियाकडून प्रतिक्रिया उमटली असून रशियानेही व्यापक नौदल सरावांची घोषणा केली आहे. जानेवारीच्या अखेरीस तसेच फेब्रुवारी महिन्यात रशियन नौदलाचा भाग असलेले सर्व आरमारी तळ सरावात सहभागी होणार आहेत. पॅसिफिक महासागरासह अटलांटिक महासागर, नॉर्थ सी, सी ऑफ ओखोत्स्क, भूमध्य सागर, आर्क्टिक अशा सर्व सागरी क्षेत्रांमध्ये सरावाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सरावात १४० युद्धनौका, ६० विमाने, एक हजार संरक्षणयंत्रणा व सुमारे १० हजार जवान सहभागी होणार असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.

दरम्यान, पुढील आठवड्यात ब्रिटनचे संरक्षणमंत्री मॉस्कोत रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेइई शोईगु यांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. युक्रेन मुद्यावरील आपत्कालिन चर्चेसाठी ही भेट असेल, अशी माहिती ब्रिटीश सूत्रांनी दिली.

leave a reply