उत्तर कोरियाबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व दक्षिण कोरियाचा युद्धसराव

US-South-Korea's-exerciseसेऊल – चार वर्षानंतर अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या नौदलामध्ये युद्धसराव पार पडला. यामध्ये अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आणि दक्षिण कोरियाच्या विनाशिका सहभागी झाल्या होत्या. उत्तर कोरियाबरोबरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये हा सराव पार पडल्याचा दावा केला जातो.

Koreas Tensionsअमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ तसेच दक्षिण कोरियाची ‘मरादो’ ॲम्फिबियस युद्धनौका आणि सेजाँग व अन्य विनाशिकांचा समावेश होता. पूर्व फिलिपाईन्सची सागरीहद्द आणि ओकिनावा बेटाचे आखात या क्षेत्रात हा सराव पार पडला. 2019 सालापासून अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्धसराव रद्द करण्यात आला होता.

US-South-Koreaपण दक्षिण कोरियात झालेल्या सत्ताबदलानंतर अमेरिकेबरोबरच्या युद्धसरावाची सुरुवात झाली आहे. तर अमेरिकेबरोबर लष्करी तळ पुरविण्याबाबत नवा करार केला जाण्याची शक्यता आहे. अमेरिका व दक्षिण कोरियातील या लष्करी सहकार्याला उत्तर कोरियाने विरोध केला होता. त्यानंतरच उत्तर कोरियाने अणुचाचणीची तयारी सुरू केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

दरम्यान, या युद्धसरावानंतर अमेरिका व दक्षिण कोरियाच्या युद्धनौका हवाई बेटासाठी रवाना होतील. या ठिकाणी लवकरच बहुराष्ट्रीय युद्धसराव होणार आहे.

leave a reply