अमेरिकेतील बँकेची दिवाळखोरी तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या संकटाचे संकेत

- तज्ज्ञ व विश्लेषकांचा इशारा

वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ दिवाळखोरीत गेल्याची घोषणा अमेरिकी यंत्रणांनी केली होती. अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रातील ही २००८ सालानंतरची सर्वात मोठी दिवाळखोरी ठरली आहे. याचे गंभीर पडसाद जागतिक पातळीवर उमटण्यास सुरुवात झाली आहे. या बँकेकडून अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू झालेल्या ‘स्टार्टअप्स’ना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य पुरविण्यात आले होते. बँक कोसळल्यामुळे अनेक स्टार्टअप्स बंद पडण्याची शक्यता असून ‘एसव्हीबी’चे अपयश तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या संकटाचे संकेत असल्याचा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी
दिला आहे.

अमेरिकेतील बँकेची दिवाळखोरी तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या संकटाचे संकेत - तज्ज्ञ व विश्लेषकांचा इशारा१९८३ साली स्थापन झालेल्या ‘एसव्हीबी’मध्ये जवळपास १७५ अब्ज डॉलर्सचा निधी अडकला आहे. काही दिवसांपूर्वी या बँकेने अमेरिकी रोख्यांसह इतर मालमत्तांच्या विक्रीत मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली होती. हे नुकसान भरून काढण्यासाठी २.२५ अब्ज डॉलर्स मूल्याच्या समभागांची विक्री करण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेने गुंतवणुकदारांमध्ये खळबळ उडाली व त्यांनी बँकेतील निधी काढण्याबरोबरच समभागांची जोरदार विक्री सुरू केली. त्यामुळे बँकेचे समभाग अवघ्या २४ तासांमध्ये तब्बल ८० टक्क्यांनी घसरले.

ही बँक अमेरिका व ब्रिटनसह अनेक देशांमधील स्टार्टअप्सना अर्थसहाय्य पुरविणारी वित्तसंस्था म्हणून ओळखण्यात येते. मात्र बँक दिवाळखोरीत गेल्याने जगभरातील शेकडो स्टार्टअप्स अडचणीत आले आहेत. अमेरिका व ब्रिटनसह स्टार्टअप्सच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या इस्रायलनेही याची दखल घेतली आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील संकटाबाबत दिलेला इशारा याला दुजोरा देणारा ठरतो.

हिंदी

 

leave a reply