अमेरिका-ब्रिटन-ऑस्ट्रेलिया आण्विक पाणबुड्यांसाठी भागीदारीची घोषणा करणार

वॉशिंग्टन/लंडन – अमेरिका-ब्रिटन व ऑस्ट्रेलिया सोमवारी आण्विक पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी भागीदारीची घोषणा करणार आहेत. चीनकडून पॅसिफिक क्षेत्रात सुरू असलेल्या विस्तारवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरते. जपानच्या दैनिकाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले असून सोमवारच्या कार्यक्रमासाठी तिन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित असतील, असा दावा केला आहे. ब्रिटनने याला दुजोरा दिला असून पंतप्रधान ॠषी सुनाक अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाल्याची माहिती दिली.

अमेरिका-ब्रिटन-ऑस्ट्रेलिया आण्विक पाणबुड्यांसाठी भागीदारीची घोषणा करणार२०२१ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ‘ऑकस’ची घोषणा केली होती. इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी चीन धोकादायक असल्याचा दावा करून अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया एकत्र येत असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले होते. आण्विक पाणबुड्या, क्षेपणास्त्रे व सायबरसुरक्षा या क्षेत्रात तिन्ही देश भागीदारी वाढवतील, असे ‘ऑकस’च्या उभारणीदरम्यान जाहीर करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्यांनी सज्ज करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे पहिल्या बैठकीत सांगण्यात आले होते. ऑस्ट्रेलियन नौदलाला आठ आण्विक पाणबुड्या देण्यावर एकमतही झाले होते.

आण्विक पाणबुड्यांची निर्मिती वेळखाऊ व खर्चिक असल्याने ब्रिटन किंवा अमेरिका आपल्याकडील आण्विक पाणबुडी ऑस्ट्रेलियाला भाडेतत्त्वावर पुरवेल, असे दावेही करण्यात आले होते. मात्र ‘ऑकस’ची उभारणी व त्यासंदर्भात झालेल्या घोषणांवर फ्रान्स, जपान यासह चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ऑकसच्या घोषणेपूर्वी फ्रान्स व ऑस्ट्रेलियादरम्यान आण्विक पाणबुड्यांबाबत चर्चा सुरू होती. मात्र अमेरिका व ब्रिटनबरोबरील चर्चेची कल्पना न देता ऑस्ट्रेलियाने परस्पर ऑकसमध्ये सहभागी होऊन विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया फ्रान्सने दिली होती. अमेरिका-ब्रिटन-ऑस्ट्रेलिया आण्विक पाणबुड्यांसाठी भागीदारीची घोषणा करणारया मुद्यावरून फ्रान्स व अमेरिका संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला होता.

चीनने पॅसिफिक क्षेत्रात आण्विक पाणबुड्यांचा वावर नव्या शस्त्रस्पर्धेला चिथावणी देणारा ठरेल, असा आरोप करून ऑकस म्हणजे शीतयुद्धकालिन मानसिकतेचे प्रतीक असल्याचा ठपका ठेवला होता. मात्र या सर्व टीकेनंतरही अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियाने आण्विक पाणबुड्यांच्या मुद्यांवर सहकार्य कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा विषय मागे पडल्याचे संकेत मिळाले होते. पण अमेरिकेने या मुद्यावर पुढाकार घेऊन आण्विक पाणबुडी नियोजित वेळेत ऑस्ट्रेलियाला मिळेल, अशी ग्वाही दिली होती.

अमेरिका-ब्रिटन-ऑस्ट्रेलिया आण्विक पाणबुड्यांसाठी भागीदारीची घोषणा करणार‘ऑकस देशांची लष्करी आघाडी मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्यांनी सज्ज करण्याच्या आपल्या निर्णयावर अमेरिका ठाम आहे. गेल्या वर्षी झालेल्या करारानुसार नियोजित वेेळेत ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्यांचा ताफा मिळेल’, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत केली होती. संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी जपानला देखील या लष्करी गटात सामील होण्यासाठी आवाहन केले होते.

सोमवारी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियाने आपली शीतयुद्धकालिन मानसिकता सोडून द्यावी. क्षेत्रिय शांतता व स्थैर्यासाठी सहकार्य करण्यावर भर द्यावा’, असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी केले.

हिंदी English

 

leave a reply