अमेरिका व ब्रिटनची रशियावर निर्बंध लादण्याची तयारी

वॉशिंग्टन/लंडन – रशियाकडून युक्रेनवर होणार्‍या संभाव्य आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व ब्रिटनने रशियावर व्यापक निर्बंध लादण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेने रशियन बँकांवर निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. तर ब्रिटनने रशियन कंपन्यांना डॉलर व पौंड उपलब्ध होणार नाहीत, अशा रितीने कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी हल्ला होण्यापूर्वीच रशियावर निर्बंध लादले जावेत, अशी मागणी केली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्‍चात्यांच्या निर्बंधांची शक्यता धुडकावली असून त्याचा रशियन अर्थव्यवस्थेवर फरक पडणार नाही, असे बजावले आहे. रशियाचा विकास रोखणे हा पाश्‍चात्यांच्या निर्बंधांचा उद्देश आहे. आता नाही तर पुन्हा कधीतरी कारणे शोधून रशियावरनिर्बंध लादले जातील, अशी टीका राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली आहे.

leave a reply