अमेरिका-ब्रिटन पाकिस्तानी कट्टरपंथियांना आश्रय देण्याची किंमत मोजत आहेत

- अभ्यासगटाचा इशारा

आश्रयवॉशिंग्टन – अमेरिका आणि ब्रिटन चांगल्या हेतूने आणि विश्‍वासाने पाकिस्तानी तरुणांना आपल्या देशात आश्रय देत आहेत. पण या तरुणांमधला कट्टरवाद रोखण्यात अमेरिका, ब्रिटन तसेच पाश्‍चिमात्य देश अपयशी ठरले. याची जबर किंमत पाश्‍चिमात्य देशांनाच चुकवावी लागत आहे, असा इशारा ‘पॉलिसी रिसर्च ग्रुप’ या अभ्यासगटाने दिला. यासाठी १९९४ साली अटक झालेल्या ओमर शेखच्या घटनेपासून ते चार दिवसांपूर्वी अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात ज्यूधर्मियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यांचा दाखला या अभ्यासगटाने दिला.

आश्रयगेल्या आठवड्यात शनिवारी अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील कॉलिव्हिले येथील ज्यूधर्मियांच्या प्रार्थनास्थळात घुसून पाकिस्तानी वंशाच्या एकाने चार जणांना ओलीस धरले होते. तीन तासांच्या प्रयत्नानंतर अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनी हल्लेखोराला ठार करून नागरिकांची सुटका केली होती. ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेश-एफबीआय’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हा हल्लेखोर ‘मलिक फैझल अक्रम’ ब्रिटनचे नागरिकत्त्व घेतलेला पाकिस्तानी असल्याचे उघड झाले होते.

‘लेडी अल कायदा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आफ्रिया सिद्दीकीच्या सुटकेसाठी अक्रम याने हा हल्ला चढविला होता. अमेरिकेच्या न्यायालयाने अफगाणिस्तानात तैनात अमेरिकेकी सैनिकांवर हल्ल्याचा कट आखणार्‍या आफियाला ८६ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. ही आफिया देखील पाकिस्तानी आहे.

आश्रयअशारितीने अमेरिका, ब्रिटन तसेच पाश्‍चिमात्य देशांमध्ये आश्रय घेणार्‍या किंवा शिक्षण घेत असलेले पाकिस्तानी तरुण-तरुणींबाबत ‘पॉलिसी रिसर्च ग्रुप’ या अभ्यासगटाने गंभीर इशारा दिला आहे. पाश्‍चिमात्य देश चांगल्या हेतूने आणि विश्‍वासाने पाकिस्तानातून आलेल्या तरुणांना आश्रय दिला खरा. पण हे तरुण कट्टरवादाशी जोडले जातात. ही बाब पुढच्या काळात पाश्‍चिमात्य देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनत चालली आहे, याकडे या अभ्यासगटाने लक्ष वेधले.

यासाठी या अभ्यासगटाने १९९४ सालपासून आत्तापर्यंतच्या अनेक घटनांचा दाखला दिला. डॅनिअल पर्ल हत्याप्रकरणी अटक झालेला ‘अहमद ओमर सईद शेख’, २००५ साली लंडनमध्ये बस-ट्रेनमध्ये आत्मघाती हल्ले चढविणार्‍या चार दहशतवाद्यांपैकी ‘हसिब हुसेन’, ‘शहझाद तन्वीर’, व ‘मोहम्मद सादिक खान’, २००६ साली अमेरिकेच्या सिटल शहरात सिनेगॉगमध्ये गोळीबार करणारा ‘नाविद अफझल हक’, २०१० साली न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये आश्रयकारबॉम्ब बसविण्याच्या प्रयत्नात अटक झालेला ‘फैझल शहझाद’ तसेच २०१९ साली लंडन ब्रिजवर चाकूने हल्ला चढविणारा ‘उस्मान खान’ हे सारे पाकिस्तानातून आलेले होते.

याशिवाय मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटक झालेला तहव्वूर राणा हा देखील मूळचा पाकिस्तानीच होता, ह या अभ्यासगटाने लक्षात आणून दिले. हे सारे अल कायदा, तालिबान, आयएस किंवा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर प्रशिक्षण घेतले होते. पाकिस्तानातील दहशतवाद अशारितीने अमेरिका व ब्रिटनमध्ये निर्यात केला जात आहे, याची जाणीव या अभ्यासगटाने आपल्या अहवालात करून दिली.

leave a reply