सेंकाकू द्विपसमुहांच्या सुरक्षेसाठी अमेरिका-जपानच्या संयुक्त युद्धसरावाची घोषणा

युद्धसरावाची घोषणा

टोकिओ – ‘ईस्ट चायना सी’च्या क्षेत्रातील सेंकाकू या द्विपसमुहाच्या क्षेत्रातील चीनच्या आक्रमक कारवायांना उत्तर देण्यासाठी अमेरिका व जपानने संयुक्त युद्धसरावाची घोषणा केली आहे. या युद्धसरावात दोन्ही देशांचे लष्कर, नौदल, हवाईदलाबरोबर मरिन्सचे पथकही सहभागी होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी चीनच्या विनाशिकांनी जपानच्या सागरी क्षेत्राजवळून धोकादायक गस्त घातली होती. त्यानंतर सदर युद्धसरावाची घोषणा करण्यात आली आहे.

जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या तीन विनाशिका जपानच्या ‘क्युशू’ बेटाजवळ गस्त घालताना आढळल्या होत्या. ‘तुशिमा’च्या आखातात गस्त घालणार्‍या या विनाशिकांमध्ये क्षेपणास्त्रांनी

युद्धसरावाची घोषणा

सज्ज असलेल्या चिनी विनाशिकेचाही समावेश होता. चीनच्या विनाशिकांनी जपानच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केली नाही. चीनच्या विनाशिकांनी धोकादायकरित्या गस्त घातल्याची टीका जपान करीत आहे.

युद्धसरावाची घोषणागेल्याच महिन्यात चीनने आपल्या तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांमध्ये वाढ केली आहे. चीन दावा करीत असलेल्या सागरी क्षेत्रात परदेशी जहाजांनी घुसखोरी केल्यास गोळीबार करण्याचे अधिकार चीनने आपल्याला तटरक्षक दलाला दिले आहेत. यावर जपानने चिंता व्यक्त केली असून अमेरिकेबरोबर पार पडलेल्या ‘टू प्लस टू’च्या बैठकीतही यावर चर्चा झाली होती. त्यावेळी अमेरिकेने चीनच्या या कायद्यावर टिपणी केली होती.

पण अमेरिकेच्या टीकेला किंमत न देता चीनने जपानच्या हद्दीजवळ तीन विनाशिका रवाना केल्या. चीनच्या या कारवाया जपानच्या ‘सेंकाकू’ द्विपसमुहाच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतात. कारण या द्विपसमुहावर चीनने आपला अधिकार सांगितला आहे. या पार्श्‍वभूमीवर, सेंकाकूच्या सुरक्षेसाठी जपान आणि अमेरिका मोठ्या युद्धसरावाचे आयोजन करणार असल्याची घोषणा जपानचे संरक्षणमंत्री नोबूओ किशी यांनी केली.

अमेरिका किंवा जपानने सदर युद्धसरावाचे ठिकाण व काळ याचे तपशील जाहीर करण्याचे टाळले आहे. पण उभय देशांमधील हा सर्वात मोठा युद्धसराव असेल, असा दावा जपान करीत आहेे.

leave a reply