चीनला शह देण्यासाठी अमेरिका व जपान व्यापारी सहकार्य मजबूत करणार

व्यापारी सहकार्यटोकिओ/वॉशिंग्टन – चीन आर्थिक बळाचा वापर करून इतर देशांमध्ये राजकीय बदल व इतर गोष्टी घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या या कारवाया रोखण्यासाठी अमेरिका जपानसह समविचारी देशांबरोबर व्यापारी सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देईल, अशी ग्वाही अमेरिकेचे जपानमधील राजदूत राहम इमॅन्युअल यांनी दिली. जपानबरोबर चिप्स, बॅटरीज्‌‍ व ऊर्जा या तीन क्षेत्रांमधील भागीदारी वाढविण्यावर अमेरिका लक्ष केंद्रित करणार असल्याचेही इमॅन्युअल यांनी स्पष्ट केले. गेल्याच आठवड्यात जपानच्या परराष्ट्र तसेच व्यापारमंत्र्यांनी अमेरिकेला भेट दिली होती. या भेटीत सेमीकंडक्टर्स क्षेत्रातील सहकार्यावर एकमत झाल्याची घोषणा करण्यात आली होती.

चीनने गेल्या काही वर्षात आपल्या आर्थिक व व्यापारी सामर्थ्याचा वापर करून आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका तसेच युरोपिय देशांमध्ये हस्तक्षेप सुरू केला आहे. कोरोनाच्या साथीपासून ते तैवानच्या मुद्यापर्यंत चीनच्या सत्ताधारी राजवटीविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांवर चीन सातत्याने दडपण टाकत आहे. यामध्ये निर्यात थांबविण्यापासून ते करार रद्द करण्यापर्यंत अनेक मार्गांचा वापर चीन करीत आहे. याविरोधात अमेरिकेसह युरोपिय देश तसेच आशिया-पॅसिफिकमधील आघाडीचे देश एकत्र येऊन चीनला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आर्थिक व व्यापारी सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून अमेरिकी राजदूतांनीही हाच मुद्दा अधोरेखित केला.

व्यापारी सहकार्य‘बौद्धिक संपदेची चोरी, आक्रमकता, कर्जाचा विळखा यासारख्या माध्यमातून चीनने राजकीय बदल किंवा इतर प्रकारातील हस्तक्षेपाचा प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे जगभरात उघड झाली आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक देश आता या मुद्यावर जागृत होत असल्याचे दिसत आहे. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ेलियासह युरोपिय तसेच आग्नेय आशियाई देशांनी चीनच्या कारवायांचा अनुभव घेतला आहे’, असे इमॅन्युअल यांनी सांगितले. जपानसह अनेक देश चीनच्या या वाढत्या दादागिरीचा मुद्दा सातत्याने उचलून धरत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चीनला रोखण्यासाठी जपानने संरक्षण पातळीवर पुढाकार घेतला असून आर्थिक व व्यापारी सहकार्य हा देखील धोरणात्मक भागीदारीतील महत्त्वाचा टप्पा आहे, असा दावा अमेरिकेच्या राजदूतांनी केला.

व्यापारी सहकार्यइलेक्कि गाड्यांच्या बॅटरीज्‌‍, मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर्स, सेमीकंडक्टर्स, हवाई क्षेत्रातील तंत्रज्ञान व ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी अमेरिका आणि जपानमधील वाढत्या व्यापारी सहकार्याचे संकेत देणारी आहे, याकडे इमॅन्युअल यांनी लक्ष वेधले. अमेरिकेचे राजदूत म्हणून काम करतानाही आपण याच सहकार्यावर अधिकाधिक भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्याच आठवड्यात जपानच्या परराष्ट्र तसेच व्यापारमंत्र्याचा सहभाग असलेल्या उच्चस्तरिय शिष्टमंडळाने अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात ‘नेक्स्ट जनरेशन सेमीकंडक्टर्स’साठी संयुक्त संशोधनकेंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी अमेरिका व जपानची कंपनी जपानमध्ये सेमीकंडक्टर्सचे उत्पादन सुरू करणार असून त्यासाठी जपान 70 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. जपानच्या ‘पॅनासोनिक’ या आघाडीच्या कंपनीने अमेरिकेत इलेक्कि गाड्यांच्या बॅटरीसाठी नवी फॅक्टरी उभारण्याचेही जाहीर केले आहे.

leave a reply