७६८ अब्ज डॉलर्सच्या संरक्षणखर्चाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मंजुरी

वॉशिंग्टन – सोमवारी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी वित्तीय वर्ष २०२२ साठीच्या अमेरिकेच्या ‘नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन ऍक्ट-एनडीएए’च्या मसुद्यावर स्वाक्षरी केली. यामुळे ७६८.२ अब्ज डॉलर्सच्या संरक्षणखर्चाला मंजुरी मिळाल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली. अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅट्स आणि विरोधीपक्ष रिपब्लिकन्स यांच्यातील तीव्र रस्सीखेचनंतर सदर संरक्षणखर्च पारित करण्यात आला होता.

७६८ अब्ज डॉलर्सच्या संरक्षणखर्चाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मंजुरीगेले काही आठवडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या संरक्षणखर्चावर अमेरिकन सिनेट व कॉंग्रेसमध्ये जोरदार वाद सुरू होते. ‘एनडीएए २०२२’नुसार लष्करी खर्चात पाच टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा केला जातो. ‘पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटीव्ह’साठी एनडीएएमध्ये सात अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनचा प्रभाव मोडून काढण्यासाठी आणि तैवानच्या सुरक्षेसाठी यात मोठी तरतूद असल्याचे बोलले जाते.

तर ‘युक्रेन सिक्युरिटी असिस्टन्स’मधून ३० कोटी डॉलर्स मंजूर झाले आहेत. याअंतर्गत युक्रेनच्या लष्कराला सहाय्य केले जाईल. तर ‘युरोपियन डिफेन्स इनिशिएटीव्ह’ म्हणून चार अब्ज डॉलर्स आणि बाल्टिक देशांच्या सुरक्षेसाठी १५ कोटी डॉलर्सच्या सहाय्याचा समावेश आहे.

leave a reply