इस्रायल-सौदी-इजिप्तमधील ‘डिल’साठी अमेरिकेचे प्रयत्न

- अमेरिकन वृत्तसंस्थेचा दावा

‘डिल'वॉशिंग्टन – अमेरिकेचे बायडेन प्रशासन अतिशय गुप्तपणे इस्रायल, सौदी अरेबिया आणि इजिप्तमध्ये मध्यस्थी घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रेड सीच्या क्षेत्रातील सनाफिर आणि तिरान या बेटांच्या निमित्ताने या हालचाली सुरू असल्याचा दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने केला. या वाटाघाटी यशस्वी ठरल्या तर इस्रायल आणि सौदीमध्ये सहकार्य सुरू करण्यासाठी ही पहिली पायरी ठरेल, असे अमेरिकी वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. या निमित्ताने अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी सौदीमध्ये दाखल झाल्याच्या बातम्या येत आहेत.

‘डिल'इजिप्तमधील सिनाई प्रांताच्या दक्षिणेकडे आणि रेस सीच्या मुखाशी सनाफिर आणि तिरान या दोन बेटांच्या हस्तांतरणावरुन इस्रायल व सौदीमध्ये चर्चा होऊ शकते, असे अमेरिकन वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. ही दोन्ही बेटे गेली कित्येक दशके इजिप्तच्या नियंत्रणाखाली होती. 1950 साली सौदीने इजिप्तला ही बेटे बहाल केली होती. या बेटांवर लष्कर तैनात करण्यात आले होते. पण 1979 साली इस्रायल आणि इजिप्तमध्ये झालेल्या करारानंतर या बेटांवरील लष्करी तैनाती मागे घेण्यात आली.

‘डिल'आता इजिप्तचे सरकार हीच सनाफिर आणि तिरान बेटे सौदीला परत देणार आहे. यासंबंधी अमेरिका इस्रायलला हाताशी घेऊन वाटाघाटी करीत असल्याची माहिती अमेरिका व इस्रायलच्या सूत्रांनी अमेरिकी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. रेड सीच्या तोंडाशी असलेली ही बेटे जॉर्डनच्या अक्बा आणि इस्रायलच्या एलियट या दोन्ही बंदरशहरांच्या सागरीमार्गात येतात. या बेटांवरील सौदीच्या ताब्यामुळे इस्रायलच्या व्यापारी जहाजांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ नये, अशी इस्रायलची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर, सनाफिर आणि तिरान बेटांची ‘डिल’ ‘डिल'करण्यासाठी अमेरिकेने इस्रायल, सौदी व इजिप्त या तीनही देशांना एकत्र आणल्याचा दावा अमेरिकन वृत्तसंस्थेने केला. या वाटाघाटीचे तपशील निश्चित झालेले नाहीत. अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी यासाठी सौदीत दाखल झाल्याचा दावा केला जातो. त्यानंतर अमेरिका वाटाघाटीच्या या तपशीलांवर इस्रायलची सहमती मिळविल. असे झाले तर ही इस्रायल आणि सौदी सहकार्याची पहिली पायरी ठरेल, असा दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने केला आहे.

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने या घडामोडींची दखल घेतली आहे. तसेच गेल्या आठवड्यात इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ आणि सौदीचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालिद एकाचवेळी अमेरिकेत होते. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने याची विशेष दखल घेतली होती.

leave a reply