युएई-अमेरिका संबंध तणावपूर्ण बनले आहेत

-अमेरिकेतील युएईचे राजदूत

अबु धाबी – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत व आमसभेत भारतसह युएईने देखील रशियाच्या विरोधात मतदान करण्याचे टाळून तटस्थ भूमिका स्वीकारली. याचा फार मोठा धक्का अमेरिका बसल्याचे दिसते. अमेरिका व युएईमधील संबंध आधीसारखे मधुर राहिलेले नाहीत, हे यामुळे उघड झाले असून युएईच्या अमेरिकेतील राजदूतांनी तशी कबुलीच दिली आहे.

युएई-अमेरिकाआत्तापर्यंत युएई आणि अमेरिकेमध्ये मजबूत धोरणात्मक सहकार्य असल्याचे आपण पाहिले आहे. पण सध्या हे संबंध तणावपूर्ण बनले आहेत, अशी स्पष्ट कबुली युएईचे अमेरिकेचे राजदूत युसेफ अल-ओतैबा यांनी दिली. येमेनचा संघर्ष, इराणबरोरचा अणुकरार आणि शस्त्रखरेदीवर टाकलेली बंदी यामुळे अमेरिका व युुएईमधील सहकार्य प्रभावित झाल्याचे संकेत राजदूत ओतैबा यांनी दिले आहेत.

गेल्या वर्षभरातील बायडेन प्रशासनाच्या धोरणांमुळे युएस, सौदी अरेबिया व इतर अरब मित्रदेश अमेरिकेवरील विश्‍वास गमावून बसल्याचा इशारा अमेरिकेतील लोकप्रतिनिधी सातत्याने देत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये रशियाविरोधी ठरावात युएईने स्वीकारलेली तटस्थ भूमिका हेच दाखवून देत असल्याचा इशारा ‘युरोपियन काऊन्सिल ऑन फॉरिन रिलेशन्स’ या अभ्यासगटाच्या विश्‍लेषिका सिंझिया बियान्को यांनी दिला.

leave a reply