पहिल्या डबल स्टॅक  इलेक्ट्रिफाईड रेल्वे भुयाराचे काम प्रगतीपथावर

Electrified-Railway-Tunnelनवी दिल्ली – हरियाणाजवळ अरवलीच्या पर्वतरांगातून जाणाऱ्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिफाईड रेल्वे भुयाराच्या कामाने वेग घेतला आहे. शुक्रवारी या भुयाराच्या एक किलोमीटर पर्यंतच्या उत्खननाचे काम पूर्ण झाले. या भुयारातून डबल स्टॅक कंटेनर मालवाहू ट्रेन सुरक्षितरित्या धावू शकेल. हा भुयारी मार्ग हरियाणाच्या मेवात आणि गुरुग्राम जिल्ह्यांना जोडला जाणार आहे.

गेल्यावर्षी ‘द डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कोऑपरेशन’ (डीएफसीसी) या कंपनीने या भुयाराचे काम हाती घेतले आहे. अरवली पर्वतरांगातले खडक फोडून भुयार करणे हे आव्हानात्मक होते. हे आव्हान या कंपनीच्या इंजिनिअर्सने यशस्वीरीत्या पेलून दाखवले. शुक्रवारी या भुयाराचे एक किलोमीटर पर्यंतचे काम पूर्ण झाले. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळातही कमी वेळेत हे काम झाल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे.

Electrified-Railway-Tunnel२०२० पर्यंत हा भुयार तयार झालेला असेल. हा भुयार डी आकाराचा असून तो सुरक्षित आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या भुयारातून डबल स्टॅक कंटेनर मालवाहू ट्रेन ताशी १०० किलोमीटरहून अधिक वेगाने धावेल. हा भुयार रेल्वेच्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा भाग आहे. अशा प्रकारचे सहा भुयार बांधले जाणार असल्याचे सांगितले जाते.

leave a reply